Raigad Fort Information In Marathi| रायगड किल्ल्याची संपूर्ण  माहिती

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi: “रायगड किल्ल्याची संपूर्ण  माहितीछत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्तीत अनेक गडकिल्ले होऊन गेले तब्बल 350 किल्ल्याहुन जास्त गडकिल्ले महाराजांनी स्वराज्याला मिळवून दिले परंतू, “रायगड“ महाराष्ट्राच्या किल्ल्यातील हा सर्वात महत्वाचा किल्ला मानला जातो. रायगड किल्ल्याची माहिती ही तर अनेक जणांना महिती असतेच असते. कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत राजधानीचा किल्ला होता.

रायगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून तब्बल 2690 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगेत आहे. या किल्ल्यामागे सुवर्ण इतिहास आहे. कारण याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. राजगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हायकिंग स्पॉट मानला जातो अनेक लोक इथे हायकिंग करण्यासाठी सुद्धा येता. तसंच याच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी  त्यांचा शेवटचा श्वास घेतला आणि प्रान सोडले होते. इतिहासात अनेकदा मुघलान कडून व इंग्रजांकडून आक्रमण होऊनही हा किल्ला आजही अभेद्य व चांगल्या स्थिती  मध्ये पहायला आपल्याला दिसतो. राजगड या किल्ल्यावरील हिरकणीची कथाही प्रसिद्ध आहे.

इथे हिरकणीचा बुरूज आणि महा दरवाजा ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत, म्हणूनच आज  Thoughtmarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलाय रायगड किल्ल्याची संपूर्ण  माहिती जी तुम्हाला वाचून समजेल की त्याकाळी रायगड नक्की कसा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला कसा बनवाला असेल.

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्लाची सुरुवातीची माहिती👇

रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असून समुद्र सपाटीपासून सुमारे ८२० मीटर २७०० फूट उंचीवर स्थिर आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख सुद्धा आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून इसविसन १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी सुद्धा बनविली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सुद्धा याच ठिकाणी झाला होता. इंग्रजांनी गड जेव्हा कब्जात घेतल्यानंतर व गड लुटून त्याची नासधूस केली होती. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या विभागाचे संरक्षित स्मारक म्हणून आहे.

रायगड हा किल्ला पाचशे वर्षांपूर्वी एक गड नव्हता त्याचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर भाग होता, पुर्वी रायगडाला ‘रासिवटा’ व ‘तणस’ अश्या दोन नावाने ओळखले जात होते. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्याला‘नंदादीप’ असेही नाव पडले होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग पकडलेले कैदी ठेवण्यासाठी केला जाई . मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे हे त्यावेळी विजापुर दिशेने पळाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांच्या कानावर आली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली होती. रायगड किल्ल्याचे इतिहासात पूर्वीचे नाव जम्बुदीप असेही होते.

Raigad Fort Information In Marathi

रायगडाची स्तुती करताना महाराज म्हणतात की रायगड हा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि’ हे बघून महाराज खुशीने म्हणाले होते की, तख्तास जागा हाच गड करावा’. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखमध्ये सुद्धा आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.

शिर्के हे पाचव्या शतकापासूनच रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर उपस्थित आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे शिरकाई मंदिर बांधले होते. परंतू ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर रायगडाच्या राजवाड्यास लागून डावीकडे असलेया होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही दिसन्यात येतो. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.

Raigad Fort Information In Marathi

हे ही वाचा👉छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार

महाराजांचा रायगडावरील शिवराज्याभिषेक👇

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४ ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला होता.

1) रायगडावरील⛰️महादरवाजा: रायगडावरील महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर देखने कमळाकृती कोरल्या गेलेल्या आहेत, दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ असे अर्थ होते. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरे ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली दिसुन येते.

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

2) रायगडावरील⛰️नाना दरवाजा: नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा म्हणुन या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही बोलतात इसविसन १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील जेव्हा “हेन्‍री ऑक्झें” डन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या सुद्धा आहेत. त्यांस ‘देवडा’ असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी सुद्धा दिसुन येते.

3) रायगडावरील⛰️मशीदमोर्चा: रायगडाच्या चित्‌ दरवाजाने समोरुन गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी भाग लागतो. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसायलामिळतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठारे आहेत. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे सुद्धा पहायला दिसते. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा सुद्धा दिसतात.

4) पाचाडचा रायगडावरचा⛰️जिजाबाईंचा वाडा: उतारवयात मासाहेब-जिजाबाईंना गडावरील थंड हवा, वारा,वातावरण सहन होत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला होत. तोच हा मासाहेबांचा राहता पाचाडचा वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली तिथे केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्याची विहीर’ असेही म्हटले जाते. मासाहेब-जिजाबाईंना अनेक गोष्टींची जाणीव हा वाडा करुन देतो.

Raigad Fort Information In Marathi

5) रायगडावरील⛰️बाजारपेठ: नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’आहे. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला दिसुन येतो. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे. ह्या बाजारपेठेकडे बगितल्यावर एक गोष्ट समजते की त्या काळी महाराजांच नियोयन व व्यवसाहीक महिती किती असेल.

6) नगारखाना⛰️गडावरील: गडावरील सिंहासनाचा समोर जे भव्य-दिव्य मोठ प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

Raigad Fort Information In Marathi

7) गडावरील राजसभा: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला होता, तीच ही राजसभा. राजसभा ही २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा सुद्धा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून त्याकाळी मोठी मोलाची रत्‍ने सुद्धा जडाव केली गेली होती.

8) गडावरील पालखी दरवाजा: स्थिर स्तंभांचा पश्चिमेकडे भिंत असलेल्या भागातून तब्बल ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा आहे. या दरवाजातून बालेकिल्ल्यात सुद्धा प्रवेश करता येतो.

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

9) मेणा दरवाजा: पालखी दरवाजा समोर  वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश सुद्धा करता येतो.

10) गडावरील रत्‍नशाळा: राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

11) शिरकाई देवीचे देऊळ: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते आई-शिरकाईचे देऊळ आहे. शिरकाई ही रायगडा-वरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. आसे म्हणतात ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.

12) जगदीश्वर मंदिर: बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो

Raigad Fort Information In Marathi

13) गडावरील महाराजांची समाधी: मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसुन येतो  तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ इसवी1680 या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाचा चिर्याचे  सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.

दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इसविसन१६७४ मध्ये इंग्रज वकील “हेनरी ऑक्झेंडन: यांना राहायला दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, तिथुनच सर्व प्रकारच्या बारा टाक्या दिसतात.

14) रायगडावरील टकमक टोक: गडावर बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केली जायाची.

15) वाघदरवाजाचे वैशिष्ट: गडावरील कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. व ह्या वाघदरवाजा इतिहासात खुप महत्व दिले आहे.

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi

16) रायगडावरील हिरकणी टोक: गडावरिल गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे. तुम्हाल सर्वांना कहाणी तर माहितच असेल,हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा मार्गात आहेत. त्यामुळे युद्ध शास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीच्या नजरेने ही खूप महत्त्वाची आणि कामाची  जागा आहे.

17) गडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी: खुप ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा फक्त एक बनावत कहाणीशी केला जातो ठोस आसे पुरावे फक्त एक समाधीच आहे परंतू इतिहासात अस सुद्धा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा आगीत उडी मारली होती म्हणून त्या ठिकाणी  वाघ्या कुत्र्याची समाधी सुद्धा दिसून येते.

खुप लोक गडावर येण्याचा प्रयत्न करतात पण त्यना रहण्याची सोप सापडत नाही किंवा पूर्णातहा महिती मिळत नाही, परंतु रायगडावरराहण्यासाठी उत्तम सोय आहे, गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.त्याचप्रमाणे गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत.

आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील सर्व रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल, जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीनीन सोबत आणि तुमच्या जववळचया नातेवाईकां-सोबत नक्कीच Share करा, व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्की Follow करा, कारण आम्ही तुमच्या साठी आशीच नव-नवीन महिती घेऊन येत असतो, ज्याचा तुम्हाला नक्कीच खुप फायदा होईल, सर्व महिती वाचल्या बद्दल सर्वांचे खुप-खुप आभार, तुमचा दिवस चांगला जावो,धन्यवाद.

Raigad Fort Information In Marathi

हे ही वाचा👇  

1) छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहिती

2) 100+ स्वामी समर्थांचे विचार

3) 100+सुंदर हृदयस्पर्शी विचार

Raigad Fort Information In Marathi

🙏धन्यवाद🙏