Sant Dnyaneshwar Information In Marathi
Sant Dnyaneshwar Information In Marathi: “संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण माहिती” ज्यांनी मनोभावे पांडुरंग परमात्म्याची भक्ति केली. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांची वारकरी संप्रदायात ओळख निर्माण झाली. आश्या संत ज्ञानेश्वर महाराजांची thoughtmarathi.com वर आज आपण त्यांची संपूर्ण महिती बगणार आहोत, त्यांच्या जन्मा पासून सुरु होणारा प्रवास ते मरे पर्यंत चा सर्व गोष्टी खालील प्रमाणे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
Sant Dnyaneshwar Information In Marathi
🔴 संत ज्ञानेश्वर महाराजांची परिवारीक माहिती👇
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचं नाव श्री “विठ्ठलपंत कुलकर्णी” तसेच त्यांच्या आईचे नाव “रुक्मिणीबाई कुलकर्णी” असं होतं. ते एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील जन्माला आलेले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सहित ते चौघे भावंडं असून संत ज्ञानेश्वरांचे त्यांच्यात सर्वात थोरले बंधू संत “निवृत्तीनाथ” नंतर “ज्ञानदेव” यांची धाकटी भावंडं “सोपान”, “मुक्ताबाई” अशी ही चार मुल विठ्ठलपंत कुलकर्णी यांना झालेली होती.
🔴 संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण👇
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण सांगायचे तर अत्यंत खडतर व अनेक संकटना लढट प्रवासात निघूनगेले. जे काही अन्याय त्यांनी सोसला आहे व सहन केला आहे आसा,त्यांच्या बालपणीचा संघर्ष खरतर कुणाच्याच वाट्याला येऊ नये. गोदावरी नदी किनारी असणाऱ्या आपेगाव येथे जरी या चार भावंडांचा जन्म झाला असला तरीही ते आपेगावला जस्त काळ राहिले नाही. जेव्हां विठ्ठलपंत यांचा विवाह रुक्मिणीबाई यांच्यासोबत झाला तेव्हा संसारात न रमता ते काशी या गावी निघून गेले. आणि तिथे जाऊन सन्यास सुद्धा घेतला.
विठ्ठलपंत कुलकर्णी हे एक विरक्त संन्यासी होते. ते विवाहित असूनही त्यांनी संसाराचा त्याग केला हे जेंव्हा त्यांच्या गुरूच्या लक्षात आलं तेंव्हां त्यांनी विठ्ठलपंत यांना काशी येथून परत पाठवलं. विठ्ठलपंत हे नंतर तीर्थयात्रा करत असताना आळंदी येथे येऊन कायमचे रहिवाशी झाले.
पण इथे सुद्धा त्या गावातील लोकांनी त्यांना अपिवत्र व दोषी समजून त्यांना वाळीत टाकल. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक माणसाची ते हेटाळणी करू लागले. त्यांच्याशी कोणीच नित बोलत नव्हते, त्या सर्वांना ते हिनवू लागले. विठ्ठलपंत यांच्या सर्व मुलांची मुजं करण सुद्धा तिथल्या ब्रम्हणानी नाकारली. आपल्या कुटुंबाची हि सर्व होणारी अवहेलना बघून ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी तिथल्या धर्म शास्त्र पंडितांना यावर उपाय काय करता येईल असा प्रश्न त्यांना विचारला.
Sant Dnyaneshwar Information In Marathi
परंतू त्यावर एकच उपाय तो म्हणजे तुम्हाला देहत्याग करावा लागेल, यावर शिक्षा ती एकचं ती म्हणजे देहदंड. हे एकूण आपल्या मुलांना इथल्या समाजात स्थान प्राप्त व्हायला हवं. त्यांना कुणी त्रास देऊ नये. त्यांचं भविष्य उज्ज्वल घडाव तसेच त्यांची रितीप्रमाने मूंज व्हावी असे अनेक कारणं लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई कुलकर्णी यांनी इंद्रायणी मध्ये स्वतःला झोकून देऊन आपलं आयुष्य समाप्त केले व तिथेच प्राण त्याग केला. आपल्या पोटच्या पोरांना कुठल्याही संस्करापासून वंचित राहू नये हा मानस उरात बाळगून अगदी जड अंतःकरणाने त्यांनी स्वतःला संपवत देहांताचा स्विकार केले.
खरतर असं बालपणी अचानक आई वडिलांचं सोडून जाणं या चारही भावंडासाठी अत्यंत मोठं दुःख होतं. पण त्या दुःखाला पर्याय नव्हता. आई वडिलांच्या देह त्यागानंतर देखिल लोकांनी त्यांना त्रास देणं काही सोडलं नाहीं. एका संन्याशी व्यक्तींची मुलं म्हणुन त्यांना लोकं अन्न, पाणी देखिल देत नव्हते. ते भिक्षा मागायला गेले तर लोकं घराचे दरवाजे लावून घेत असतं. त्यांच्यावर दगड, सेनाचा मारा करत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते आपली विद्वत्ता सिध्द करण्यासाठी पैठण ला रवाना झाले. त्या काळी पैठण हे न्यायपीठ होतं. पुढे तिथे ही त्यांना प्रवास कठीणच करावा लागला.
हे ही वाचा👉छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहिती
Sant Dnyaneshwar Information In Marathi
🔴संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील चमत्कारिक प्रसंग👇
पैठणचा प्रवास-पैठणचा प्रवास- सर्व भावंडाना घेऊन माऊली पैठण मध्ये शुद्धिपत्र घेण्यासाठी आले तेव्हा तिथे धर्मपीठ अधिकारी मंडळींनी त्यांचे शुद्धिपत्र नाकारले. त्यांच्यातील विद्वत्ता सिध्द करण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. “पैठण” येथे देखिल त्यांना कुणी भिक्षा वाढली नाही. एकदा तर ज्ञानेश्वरांना मांडे खाण्याची इच्छा झाली तेंव्हा ते भाजण्यासाठी मुक्ताबाई खापर आणायला गेल्या परंतू त्यांना साधं खापर सुद्धा कुणी दिलं नाही. उलट त्यांना त्रास मात्र दीला. तेंव्हां ज्ञानेश्वरांनी मुक्तेस ते मांडे आपल्या पाठीवर भाजायला सांगितले. आणि खरचं काही वेळातच मांडे भाजले गेले.
हा माऊलीने केलेला चमत्कार त्या काळात विलोभनीय होता. आणि ह्याच चमत्कारामुळे पुढे खुप लोकांनी संत ज्ञानेश्वरांना मानायला सुरुवात केली आस ग्रंथात म्हटल जात. तिथल्या काही पंडित लोकांनी त्यांच्या ज्ञानावर संशय घेत नियमित त्यांना हिणवलं. एकदा तर ते माउलींना म्हणाले तू म्हणतोस सर्वत्र ईश्वराचा वास आहे.
मग हा इकडे येणारा रेडा वेद बोलेल का ? तेंव्हा मात्र माउलींनी शुध्द अंतकरणाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा खरोखर आपल्या मुखातून वेद बोलायला लागला. तिथली दिग्गज व्दिज मंडळी चकित झाली. या प्रसंगाचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज देखील आपल्या एका अभंगात लिहितात ” (रेड्यामुखीं वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांतीरुपें प्रगटला हा ज्ञानोबा माझा)
Sant Dnyaneshwar Information In Marathi
संत ज्ञानेश्वर महाराजांनी अशे अनेक चमत्कार त्यांनी आपल्या कारकीर्दी जीवनात केले त्यातला एक अजून चमत्कार सांगायचा म्हणटला तर ते एकदा चांगदेव यांनी या चारही भावंडांची कीर्ती एकूण यांना भेटायचं ठरवलं. आणि ते भेटायला निघाले सुद्धा त्या आधी त्यांनी माउलींना पत्र पाठवले परंतू ते पत्र कोरेच होते. त्यामुळे निवृत्ती नाथांनी माऊलीला त्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले ते उत्तर पूढे “चांगदेव पासष्टी” म्हणुन ओळखले जाऊ लागले. जेव्हां चांगदेव वाघावर बसून माउलींना भेटायला निघाले तेंव्हां हे चारही भावंडं एका निर्जीव भिंतीवर बसले होते.
परंतू माउलींनी त्या भिंतीला अज्ञा केल्याने ती सुध्दा चालायला लागली. हा सर्व चमत्कार पाहून चांगदेव महाराजांनी त्यांचें दर्शन घेतले. आणि चांगदेव यांनी मुक्ताबाई यांना आपले गुरू मानले. असे अनेक चमत्कार त्यांनी आपल्या आयुष्यात केले. तेंव्हा पैठण येथिल लोकांना उशिरा का होईना हे सर्व समजलं व त्यांनी हळू हळू संत ज्ञानेश्वरांना मानायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की आई वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलास का द्यावी म्हणून अनेक मंडळींच्या सांगण्यावरून पैठण येथील धर्म पीठाने सन. 1288 ला संत ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धिपत्र देऊन आपल्या धर्मात परत घेतले.व तिथून पुढील प्रवास सुरु झाला.
Sant Dnyaneshwar Information In Marathi
🔴संत ज्ञानेश्वर महाराज व यांचा समाधी सोहळा कार्यक्रम👇
महाराजांच्या ह्या सर्व संघर्षमय व कठीण जीवन जगताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाची प्रचंड मोठी शिदोरी “ज्ञानेश्वरी” या अमूल्य ग्रंथाच्या रुपाने इथल्या अज्ञानी लोकांच्या हाती दिली. स्वतः मात्र प्रत्येक मार्गवर त्रास सहन करुन वयाच्या एकविसाव्या वर्षी आपली आयुष्याची कारकीर्द संपवत इंद्रायणी नदीच्या काठी संजीवनी समाधी घेतली. व जीवनाचा पारमार्थीक त्याग केला.
सन.1296 ला वार गुरुवार कार्तिक वद्य त्रयोदशी, शके 1218 या दिवशी हा ज्ञानमय सूर्य कायमचा अस्ताला गेला. नंतर अवघ्या एका वर्षातच त्यांच्या इतर भावंडांनी देखील आपली जीवनयात्रा संपवली. आजही कार्तिक वद्य षष्ठी पर्यंत हा समाधी सोहळा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. इथे अवघ्या देश भरातून भाविक भक्त दर्शनासाठी आफात गर्दी करतात. आषाढी वारी निमीत्त पंढरपुरी निघालेले वारकरी देखील आळंदी येथुन प्रस्थान करतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं च प्रस्थान होताना आजही त्यांच्या मंदिराचा कळस हलतो. त्यांना सर्व संप्रदायात गुरुस्थानी ठेवण्यात आले आहे.
Sant Dnyaneshwar Information In Marathi
संत ज्ञानेश्वर हे संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता महाराज यांचे समकालीन होते. त्यांनी खूप सारे अभंग, गौळणी यांच्या रचना केल्या. आजही त्यांच्या साहित्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांच्या नावाच्या गजरा शिवाय वारकरी संप्रदायातील कोणताच कार्यक्रम सुरू होत नाही. त्यांच्या जिवन चरित्रावर आधारित अनेक मराठी चित्रपट व मालिका आहेत. आज माऊलींच्या समाधी सोहळ्याला अनेक वर्ष जरी झाली असली तरी आळंदी येथे आजही भाविकांच्या भक्ती दर्शनासाठी रांगा लागतात. आश्या थोर महान संत ज्यांनी स्वत:च्या जीवनाचा त्याग केला, त्याना कोटी कोटी सादर प्रणाम.
Sant Dnyaneshwar Information In Marathi
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व माहिती खरच खुप आवडली असेल व तुम्हाला देखील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील सर्व संकटे व त्यातील काढलेला मार्ग नक्कीच बोधीत झाला असेल, आवडल्यास तुमच्या मित्र-मित्रींनीन सोबत व तुमच्या नातेवाईकांसोबत सुद्धा Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा, कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच मराठी मध्ये संतांची किंवा त्यांच्या इतिहासाची जाणीव करून ह्या आश्या लेखा मध्ये देतो, महिती संपूर्ण वाचाल्या बद्दल तुमचे अभार, तुमचा दिवस चांगला जावो, धन्यवाद.
🔵हे ही वाचा👇
1) 100+दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी
2) आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध