Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi: “फुलांची आत्मकथा निबंध 2024″देवाने या जगात अनेक सुंदर सुंदर आश्या गोष्टी निर्माण केल्या आहेत, फुले हे त्यातील एक गोष्ट आहे, निसर्गाचा एक महत्वाचा भाग आसलेल्या ह्या रंगीबीरंगी फुलांविषयी आज आपण आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत जर एक फुल बोलु शकत असत तर त्याच बोलन नक्की कस असत हे आज आपण ह्या सपूर्ण माहिती मध्ये बगणार आहोत, आपण सर्वच गुलाबाच्या किंवा इतर दुसर्या कोणत्या फुलांना जस आपल्या त्याची सुंदरता आजुन पाहाविशी वाटते तशेच thoughtmarathi.com आज फुलांची आत्मकथा मराठी निबंध तुमच्यासाठी घेऊन आलाय ह्या निबंधात 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व शाळेय विद्द्यार्थींसाठी हा सुंदर निबंध लागू होणार आहे, छोटा, मोठा, 20 ओळींचा आश्या भागात आम्ही तुमच्यासाठी निबंधत स्वरुप घेऊन आलो आहोत हे नक्कीच आपल्याला खुप आवडतील.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
😍Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi (300+ Word)
मी एक बागेमध्ये फुलणारा प्रसिद्ध फुल आहे व तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. माझ नाव आहे गुलाब मी एक फुलांचा राजा आहे. मी सध्या एका बागेत फुललेलो आहे. माझा जन्म याच ठिकाणी झाला होता. दोन दिवसांआधी मी पण माझ्या बाजूला असलेल्या या काटेरी आणि कोमल फाद्यांवर माझ्या भावांप्रमाणे झुलत होतो. कळीच्या रूपात स्वताला पाहून मनातल्या मनात विचार करीत होतो की एक दिवस मी पण सुंदर फुल बनेल. आणि वाट पाहता पाहता तो दिवस पण आला मी एक सुंदर फुल बनलो.लोक माझ्याकडे बगुन खुप खुश होतात ते बगुन मला खुप बर वातत
माझे रुप लाल,गुलाबी आशे सुंदर आहे ,माझ्या सुगंधामुळे मधमाश्या व भवरे माझ्या आजूबाजूला गोळा होऊ लागले. सकाळ सकाळी दव बिंदूनी माझी आंघोळ घातली. जोरदार हवेने माझा चेहरा पुसला आणि सुर्याच्या प्रकाशात मी खेळणे शिकलो. वसंत ऋतु मध्ये तर माझी शोभा आणखीनच वाढते. माझ्या चारही बाजूंना गुलाबाचा गुलाब दिसतात. बाकी फुले देखील खुप सुंदर प्रकारची आहेत.
या वेतेरिक्त बागेत असलेले माझे अन्य फुल मित्र चाफा, चमेली, जुही, सूर्यफूल, रातराणी व सोनकरेल आशी अनेक फुले माझ्या आजूबाजूला आहेत त्यंच्यामुळे माझी शोभा आणखीनच वाढते. आम्ही सर्वजण एकत्र येणारे लहान मुले, मोठे व वृद्ध लोकांचे लक्ष खेचून घेतात. जर कोणी मला हात लावण्याची किंवा तोडण्याची चेष्टा केली तर माझे काटे माझे रक्षण करतात. मी फक्त मधमाशांना माझा रस देत नाही तर पर्यावरणालाही प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. माझ्या सुगंधाने वातावरणाला सुगंधित व मोहक करून देतो.
आजकाल काही लोक मला विनाकारण तोडून घेतात. काही लोक मला तोडून मशीनी मध्ये टाकून देतात. तेथे माझ्या पाकळ्या पासून सुगंधित परफ्यूम व गुलाबजल तयार केले जाते. या सर्व गोष्टींचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केला जातो. मधमाशीची मद लोक तिचा पोला उद्वस्त करुन जातात हे मला बगायला आवडत नाही, तरी सुद्धा मदमाशी आपली पोली परत निर्माण करते मेहनतिने.
😍हे ही वाचा👉101+सुंदर मराठी सुविचार
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
😍Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi (250+ Word)
मी एक सुंदर फूल आहे. मला पाहून प्रत्येकाची नजर भावुक होते व मन मोहित होते. लोक मला अनेक नावांनी ओळखतात जसे चमेली, झेंडू, गुलाब, कमळ, सुर्यफुल, चंपा, मोगरा, जास्वंद इत्यादी. माझे अस्तित्व तेव्हापासून आहे जेव्हा या निसर्गाची निर्मिती झाली होती. मी निसर्गाची एक सुंदर कृती आहे, माझा सुगंध लोकांना खूप आवडतो. लोक माझ्याजवळ येऊन फोटो काढतात.
मी तेव्हापासून आहे जेव्हापासून ह्या जगत देवलोक आहेत. कारण परमेश्वराची पूजा मलाच चढवून केली जाते. मी पृथ्वीवरील प्रत्येक कानाकोपऱ्यात सापडतो. जेव्हा मी वाऱ्याच्या वेगाने हलतो तेव्हा माझे सुंदर रूप पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. सुगंधाची उत्पत्ती माझ्यापासून याच्या झाली आहे. माझ्यावर साक्षात देवी लक्ष्मीचा निवास आहे. मी बागेत बहरणारा फुल आहे सर्वजन माझ्या रंगांनी परिचित आहेत. माणूस जन्मा पासुन ते मरे पर्यंत मला वापरतात.
काही लोक माझी लागवड मोठ्या प्रमाणात करतात आज मी अनेक लोकांसाठी रोजगाराचे साधन बनलो आहे. माझे सौंदर्य वेगळेच आहे, मी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत स्वतःला मोकळे करून फुलतो. माझे सौंदर्य पाहून लोक माझ्याकडे आकर्षित होतात. माझ्या पाकळ्या अतिशय मऊ व मुलायम असतात, आणि माझ्या मधून वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित स्मेल येते. परंतु जेव्हा लोक मला विनाकारण तोडतात तेव्हा मला खूप दुःख होते ते मला तोडून थोडा वेळ वापरून फेकून देतात. पण काही लोक आठवण म्हणून पुस्तकात देखील ठेवतात.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
या जगात माझे आयुष्य खूप कमी दिवसांचे असते, परंतु तरीही मी आनंदित राहतो. दुसऱ्यांच्या चेहर्यायावर आनंद पसरवण्याचे कार्य मी करतो. मी प्रत्येकाच्या सुख-दु:खत कामी येतो. जेव्हा महान लोकांचा सन्मान केला जातो तेव्हा माझी माळा बनवून त्यांना घातली जाते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हाही लोक माझा उपयोग करतात. मला परमेश्वराच्या चरणांमध्ये चढवले जाते. मी लाल, हिरवा, गुलाबी, निळा, पांढरा इत्यादी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो. जेव्हा मी फुलतो तेव्हा मधमाश्या व भवरे माझ्यावर येऊन बसतात. मी आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापरला जातो. दररोज बाग बगीचा मध्ये फुलून त्यांची शोभा वाढवतो. परंतु जेव्हा मी सुकून जातो तेव्हा मला कचर्यात फेकून दिले जाते आणि अशा पद्धतीने माझे अस्तित्व नष्ट होते. मी जेव्हा फुललेला असतो तेवाच सुंदर असतो, लोक तेव्हाच मला बगात.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
😍Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi (400+ Word)
काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे, मी एक फुल होतो. होतो हा शब्द मी यासाठी वापरत आहे कारण मला असे वाटते की मी आता फुल राहिलेलो नाही. कारण आता मी फक्त एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेला प्लास्टिक चा तुकडा बनून गेलो आहे. माझ्या या प्रवासाची कहाणी पुढील प्रमाणे आहे.
मी एक फुल व माझा जन्म हिमालय मधील फुलांच्या एका बागेत झाला होता. त्या ठिकाणी माझ्या आजूबाजूला अनेक फुले होती आणि त्यांना मी माझ्या कुटुंबाप्रमाणे समजत होतो. त्या बागेत एक व्यक्ती होते त्यांना आम्ही माळी दादा म्हणून ओळखायचो. माळी दादा या बागेचा मालक होता. व बागेतील सर्व झाडांची आणि फुलांची काळजी तो घेत असे. माळी दादा आम्हाला खूप प्रेम करायचे नेहमी रोज पाणी घालायचे. तो बराच वेळ बागेत आम्हाला पाणी देत व आमची काळजी घेत बसायचा.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. व मी आता मोठा आणि परिपक्व झालो होतो. एके दिवशी सकाळच्या वेळी माळी दादा रोजजोरात धावत आला व त्याने मला आणि माझ्यासोबत च्या इतर गुलाब मित्राना उचलून एका गाडीत ठेवण्यास सुरुवात केली. आमच्या कुंड्यांसह आम्हाला गाडीत ठेवून शहराकडे नेण्यात आले. शहरात एका फुलांच्या दुकानाबाहेर आमची गाडी थांबली. दुकानातून काही मजुरांनी बाहेर येऊन एक-एक कुंड्या दुकानात नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. मला देखील आत नेण्यात आले व माझ्या इतर बंधू सोबत दुकानाच्या एका मोकळ्या गोडाउन मध्ये नेऊन ठेवण्यात आले.
व सायंकाळच्या वेळी दुकानाचा मालक गोदाम मध्ये आला व त्याने आपल्या कामगारांना सर्व गुलाब फुलांना तोडून एकत्रित करण्याचा आदेश दिला. त्याच्या आदेशाप्रमाणे आम्हासर्वांना तोडून एका टोपलीत ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी ही टोपली दुकानात ठेवण्यात आली. हळू हळू लोक येऊ लागले व गुलाबाची फुले खरेदी करू लागले. माझ्या आजूबाजूचे मित्र जाऊ लागले. मला कले नासे झाले होते त्यावेळी, आणि मग माझी सुद्धा वेळी आली एका व्यक्तीने मला खरेदी केले. व तो मला आपल्यासोबत घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर माझ्या लक्षात
आले की सकाळी या माणसाचे त्याच्या बायकोशी भांडण झाले होते व तिला मनवण्यासाठी तो माझी भेट देणार होता. परंतु त्याच्या बायकोचा संताप कमी झालेला नव्हता. जसेही त्याने मला तिच्या हाती दिले तिने तावातावाने खिडकीकडे येत मला बाहेर फेकले.होतो. मला कळालेच नाही काही काय नक्की झाल ते.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
व आता मी रस्त्यावर पडलो होतो. माझ्या आजूबाजूने अनेक गाड्या मोटारी जात होत्या. परंतु नशिबाने मी वाचलो व माझ्यावर कोणतीही गाडी आली नाही. थोड्या वेळाने एका व्यक्तीचे कुत्रे माझ्या जवळ आले. त्याने नाकाने मला सुंगले व यानंतर मला तोंडात धरून तो त्याच्या मालका जवळ घेऊन गेला. मालकाने मला त्याच्या तोंडातून बाहेर काढले आणि एका पिशवीत बांधून आपल्या घराच्या भिंतीवर सजवून दिले. व मी तिथेच लतकत राहिलो.
संपूर्ण गोष्टीला आज दोन दिवस झाले आहेत व आता हळूहळू माझ्यातील जीव निघत आहे. माझ्या कळ्या सुखत आहेत. मी माझे रोपट्यावरील आनंदाचे दिवस आठवून खूप दुःखी होतो. परंतु पृथ्वीवर जन्मणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंत निश्चित आहे या विचाराने मी स्वतः ला दिलासा देवून शांत करीत असतो. व मी खुप दु:खी सुद्धा होतो.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
Personal Thought: एका फुलाची आत्मकथा तर तुम्ही वाचली पण तुम्हाला महिति आहे का गेल्या 8 ते 10 वर्षात उन्हाच तापमान किती वाढव आहे, माणूस तर दिवसांन दिवस आधोगतीच्या मार्गावर चालाय पण निसर्ग फक्त “नि” ह्या शब्दापुरताच मर्यादीत रहिला आहे, जंगल तोड करुन मोठ मोठ्या इमारती तर मानवाने बांधल्या पण त्या इमारतीत रहणारी माणस एक दिवस गर्मीने नक्कीच भविष्यात मरतील हे निश्चीत, झाडे तोडली गेली, प्राणी मारले गेले जगात एक दिवस आसा ही येईल की एक हिरव झाड पाहण्यासाठी लोक पैशे देऊन जातील, लेखाच्या माध्यमातुन सांगण्याचा उदीश्य ऐवढाच की पर्यावरण वाचवा दर वर्षी किमान 100 लावलेल्या झाडांपैकी फक्त एकच झाड वाढवा.
Fulanchi Atmakatha Nibandh In Marathi
आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील सर्व निबंधीत महिती नक्कीच खुप जास्त आवडली असेल,आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीनींन सोबत व जवळच्या नातेवाईकांसोबत Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला नक्कीच Follow करा कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच नव-नवीन महिती घेऊन येत असतो.सर्व महिती वाचल्या बद्दल तुमचे खुप आभार,तुमचा दिवस चांगला जावो, धन्यवाद
😍हे ही वाचा👇
1) 100+दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मराठी
2) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती
3) आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध