Marathi Mhani|100+मराठी भाषेतील सुंदर म्हणी

Marathi Mhani

Marathi Mhani: “100+मराठी भाषेतील सुंदर म्हणी” आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयूष्यात आपण नेहमी बोलताना किंवा कोणाला काही उदाहरण सांगण्यासाठी-देण्यासाठी सहज मराठी म्हणींचा उपयोग करत असतो व पतकन बोलून जातो. वाढत्या काळाच्या ओघात मराठी म्हणी मात्र आजही त्यांचं महत्त्व राखून आहेतव सर्व जण आजही त्या रोज एकदातरी तोंडातून बोलतोच. म्हणी त्यांच्या सहज आणि उत्तम अर्थामुळे जो आजच्या काळातही लागू होतो. मोठे मोठ लेखक असोत वा एखादा साधी काम करणारी मोलकरीण बोलण्याच्या स्वरुपामध्ये ते म्हणींचा जास्तप्रमाणात उपयोग करत असतात. म्हणी या जरी छोट्या असल्या तरी त्यांचे अर्थ मात्र फारच खोल आणि अगदी मुद्यावर  बोट ठेवणारे असतात. Thoughtmarathi.com आज तुमच्या साठी आश्याच जुण्यापण कधी न ऐकलेल्या आश्या मराठी भाषेमधल्या सुंदर सरळ छोट्या सोप्प्या म्हणी ज्या तुम्हाला नक्कीच बोलायाला आवडतील.

Marathi Mhani

Marathi Mhani

1) कामापुरता मामा

2) दिव्याखाली नेहमी अंधार

3) आगीतुन फुफाट्या

4) शेरास सव्वाशेर

5) ताकापुरती आजी

हे ही वाचा👉101+सुंदर मराठी सुविचार

Marathi Mhani

Marathi Mhani

आती तेथे माती

आपला हात जगन्नाथ

दगडा पेक्षा विट मऊ

दाम करी सर्व काम

Marathi Mhani

एकावे जनाचे करावे मनाचे

👉 लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मना प्रमाणे करावे

आवळा देऊन कोहळा काढणे

👉 क्षुल्लक वस्तुंच्या मोबदल्यात मोठा लाभ करुन घेणे

आपला हात जगन्नाथ

👉 आपले काम पार पाडण्यासाठी स्वत:च कष्ट सोसणे योग्य ठरते

आलिया भोगासी असावे सादर

👉 जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे

आगीतून उठून फुफाट्यात पडणे

👉 लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे

Marathi Mhani

अति राग मग भीक माग

👉 अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करुन घेतो

आयत्या पिठावर रेघाट्या ओढणे

👉 दुसर्यानपासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

👉 मुळातच आळशी व्यक्तीस अजून अनूकुल परिस्थिती निर्माण करणे
 

आपलेच दात आणि आपलेच ओठ

👉 आपल्याच माणसांची चूक केल्यास अडचणीची  परिस्थिती  निर्माण होते

आपल्याच पोळीवर तूप ओढणे

👉 स्वार्थी प्रवृत्तीने स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे

आधीच तारे त्यात गेले वारे

👉 विचित्र व्यक्तीच्या  वर्तनात भर पाडणारी घटना घडणे

असतील शिते तर जमतील सारी भूते

👉 आपला भरभराटीची काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात

  अपापाचा माल गपापा

👉 लोकांचा तळतळाट करुन मिळवलेला पैसा-धन झपाट्याने नष्ट होते

आपण हसे लोकांना शेंबूड आपल्या नाकाला

👉 ज्या दोषाबद्दल आपण दुसर्यांना हसतो तोच दोष आपल्या अंगी असतो

अर्थी  दान महापुण्य

👉 संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने  मोठे पुण्य लागते

आईजीच्या जीवावर बाईजी उदार

👉 दुसर्याचा पैसा खर्च करुण स्वत: मोठेपणा मिरवणे

Marathi Mhani

आंगापेक्षा बोंगा मोठा

👉 मूळ अनुषांगिक गोष्टींचा बडे जाव मोठा असणे

आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते

👉 एकाने काम करावे आणि दुसर्यांने त्याचा फायदा घ्यावा

ओठावर एक आणि पोटात एक

👉 सांगताना एक सांगणे पण करताना वेगळेच करणे

अळीमिळी गुपचिळी

👉 आपले गुपीत उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे
 

इच्छा तिथे आपोआप मार्ग

👉 कोणतिही गोष्ट करावायची इच्छा असली की काहितरी मार्ग सुचतोच

उतावळा नवरा आणि  गुडघ्याला बाशिंग

👉 उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे

उडत्या पाखराची पिसे मोजणे

👉 अगदी सहजपणे कोणत्याही कठीण कामाची परीक्षा करणे

उंदराला मांजर साक्ष

👉 एखादी वाईट गोष्ट करताना एकमेकाना साथ देणे

उधारीचे  पोते सव्वा हात रिते

👉 उदारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो

एकटा जीव सदाशीव

👉 एकटा माणुस चिंतामुक्त व सदासुखी असतो

कामापुरता फक्त मामा

👉 गरजेपुरता गोड बोलणारा मतलबी माणूस

Marathi Mhani

कर नाही त्याला डर कशाला

👉 ज्याने वाईट काम केले नाही त्याला भिती वाटण्याचे कारण नाही

काना मागून आली आणि तिखट झाली

👉 मागून येऊन वरचट होणे

काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही

👉 अतूट नाते किरकोळ कारणांनी कधीच तूटत नाही

क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे

👉 काहीही काम न करता बडबड करणे व्यर्थ आहे

कुंपणाने शेत खाल्ले

👉 ज्याच्या हाती रक्षणाचे काम दिले त्यानेच नुकसान केले

कुर्हाडीचा दांडा गोतास काळ

👉 आपल्या जवळचा माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत ठरतो

कधी तुपाशी तर कधी उपाशी

👉 सांसारीक परिस्थिती कधीच नेहमी सारखी राहत नाही

कशात काय आणि फटक्यात पाय

👉 वाईटकाळात आजून वाईटपरिस्थिती निर्माण होणे

कळते पण वळत नाही

👉 चांगल्या गोष्टी कृतीत आणणे कठीण आहे

कोळसा उगळावा तितका काळाच

👉 वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते

खाई त्याला खवखवते

👉 जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते

खायला काळ आणि भुईला भार

👉 ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

खाऊन माजावे टाकून माजू नाका

👉 पैशाचा संपत्तीचा गैरवापर कधीच करु नका

खाल्ल्या मिठाला जागणे

👉 मालकाशी प्रामाणीक राहून संकटकाळी मदत करणे

गोरा गोमटा कपाळ करंटा

👉 आयुष्यात दिखाऊपणा काहीच कमाचा नसतो

घरोघरी मातीच्या चुली

👉 सर्व ठीकाणी सारखीच परिस्थिती नसते

घरात नाही एक तिळ आणि मिशाला पिळ

👉 गरीब असताना श्रीमंतीची ऐट करणे

चोरावर मोर

👉 एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्याला बरचढ ठरणे

चोराच्या मनात चांदणे

👉 आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भिती राहणे

ज्याच्या हाती ससा तो पारधी

👉 ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभाळी

👉 एकाच परिस्थितीत राहणारी माणसे एकमेकांना चांगली ओळखून असतात

Marathi Mhani

जशी देणावळ तशीच धुणावळ

👉 मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे

ठकास महाठक

👉 फसवणार्या व्यक्तीला आधीक फसवणारा मिळणे

झाकली मूठ सव्वा लाखाची

👉 मौन पाळून अब्रू राखणे

तळे राखी तो पाणी चाखी

👉 एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच

तहान लागल्यावर विहीर खणणे

👉 एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे

ताटाखालचे मांजर

👉 दुसर्याच्या पुर्ण अधीन असणे

दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ

👉 दोघे भांडत राहिले तर तिसराच त्यातून लाभ मिळवतो

थेंबे थेंबे तळे साचे

👉 थोडे थोडे साठवत राहिल्यास पूढे मोठा संचय निर्माण होतो

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी

👉 दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणूस नेहमी फसतो

दिसते तसे नसते म्हणून हे जग फसते

👉 बाहेरून अनेक वस्तू सुंदर दिसतात पण आतून त्या तशा नसतात

दुष्काळात तेरावा महिना

👉 आधीच्या आडचणीत आणखी जास्त वृद्धी होणे

धरले तर चावते आणि सोडले तर पळते

👉 एखादी गोष्ट करावी तरी त्रास सोडली तर दुर निघून जाते

नकटीच्या लग्नाला सरराशे विघ्न

👉 एखादे काम आधीच कठीण त्यात आणखी अडचणीवर अ‍डचणी येणे

नवी विटी नवे राज्य

👉 सगळीच परिस्थिती नवीन असणे

नाव मोठे लक्षण खोटे

👉 भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची      

पळसाला पाने नेहमी तीनच

नव्या नवरीचे नऊ दिवस

जसा देश तसाच वेश  

Marathi Mhani

आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील मराठी भाषेतील सुंदर म्हणी नक्कीच आवडल्या आसतील,आमची महिती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती तुमच्या मित्र-मैत्रीनींन सोबत तसेच तुमच्या जवळच्या नातेवईकांसोबत आवरजून Share कारा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला Follow करा, कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच नव-नवीन महिती घेऊन येत असतो ज्याचा तुम्हा सर्वांना फायदा होत असतो, संपूर्ण माहिती वाचल्या बद्दल सर्वांचे खुप आभार, तुमचा  दिवस चांगला जावो, धन्यवाद

हे ही वाचा👇

1) आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध

2) नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे

3) 101+मराठी💖लव शायरी

🙏धन्यवाद🙏