Mazi Aai Essay In Marathi
Mazi Aai Essay In Marathi: “आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध” जन्मा पासून ते मरे पर्यंत निस्वार्थपणे आपल्याला प्रेम करणारी ही फक्त आपली प्रेमळ आईच असते, मुलाला कितिही मारल, ओरडल, भांडन केल तरी आपल्या ओंझलीत प्रेमाने घेणारी फक्त आपली आईच असेत,मुल मोठे होतात आपल्या पायावर ऊभे राहून कय तरी करतात प्न एक व्यक्ती असते जीच्यासाठी तुम्ही नेहमी एक लहान गोंडस बाळच असता ती म्हणजे आई, जागात कोणीही आईची बरा-बरी करूशकत नाही, परमेश्वर सुद्धा नाही कारण, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, शाळेमध्ये मुलांना नेहमी आईविषयी महिती लिहायला सांगतात कधी कधी भाषण करायला सांगतात, आज thoughtmarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलेत आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध जे तुम्हाला नक्की आवडतील.
🌸ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी 🌸
Mazi Aai Essay In Marathi
🌸100 शब्द निबंध 👇
माझी आई मला खूप आवडते व ती माझ्यावर खुप प्रेम करते, कारण ती आई असण्यासोबतच माझी खूप चांगली सोबती सुद्धा आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते. ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे आरोग्य आणि जेवणाची खूप काळजी करते. कामातून वेळ काधून ती मला आभ्यासात सुद्धा मदत कारते नेहमी शाळेच्या.
Mazi Aai Essay In Marathi
मला माझ्या आई सोबत बाजारात जायला खूप आवडते. माझी आई आमच्या सर्वांच्या गरज व इच्छांची खूप काळजी करते. आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती स्वतः कडे सुद्धा दुर्लक्ष करते. माझी आई माझ्या आणि कुटुंबातील सर्व माणसांची योग्य व्यवस्थेकडे लक्ष ठेऊन असते, तिला कायम आमची काळजी लागलेली असते व ती कधीच थकत नाही.
सुट्टीच्या दिवशी माझी आई मला बागेत ही फिरायला नेते माझी आई मला कधीही कंटाळा येऊ देत नाही. जरी ती दिवसभर घरात काम करत असली तरीही ती कधीही या बद्दल तक्रार करीत नाही किंवा माझ्यावर रागवत नाही. ती कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. आई ही खरोखर परमेश्वराने दिलेले सर्वात चांगले उपहार आहे. माझी आई मला खूप आवडते तीच प्रेम माझ्यावर असच राहुदे व तिला कोणताच आयुष्यात त्रास नको होवो हिच देवाकडे माझी प्राथना.
Mazi Aai Essay In Marathi
😊हे ही वाचा👉101+मराठी सुंदर सुविचार
🌸500 शब्द निबंध 👇
जगात आई ही अशी व्यक्ती आहे जी आपल्याला जन्म तर देतेच त्याच शिवाय वाढवते आणि आपल्यासाठी जीवनभर सर्वस्व अर्पण करते. आईचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची गुरू असते. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते आणि जगण्याची कला शिकवते. आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी दिलेली देनगी आहे.
आपण आई शिवाय एका सुखी जीवनाचा विचार सुद्धा करु शकत नाही.आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. ठेच लागता हुचकी मारता आईला प्रेम व करुणे चे प्रतीक मानले जाते. एक आई ही जगभराचे दुख, वेदना आणि कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते, अनेक संकटांच्या आंधारात प्रकाश देणारी एकमेव व्यक्ती आईच असेत.
आई शिवाय आपण एका सुखी आयुष्याचा विचार सुद्धा करु शकत नाही.आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. ठेच लागता हुचकी मारता आईला प्रेम व करुणे चे प्रतीक मानले जाते. एक आई ही जगभराचे दुख, वेदना आणि कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते, अनेक संकटांच्या आंधारात प्रकाश देणारी एकमेव व्यक्ती आईच असेत आई आपल्या मुलांना सर्वाधिक प्रेम करत असते.
एका वेळी ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या मुलाबाळांसाठी जेवणाची योग्य व्यवस्था करण्यास विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एका शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही तिच्या मुलांवर नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या आयुष्यात आईच्या या प्रेमळ नात्याला कोणतच नात सिद्ध व वरचत करु शकत नाही.
Mazi Aai Essay In Marathi
माझ्या आईचे नाव मनाली आहे ती खूपच चांगल्या स्वभावाची स्त्री आहे व तशेच तिला देवपुजा व देव सेवा ह्या गोष्टींची खुप आवड आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप आभ्यास सुद्धा आहे. घराची कामे करण्यात तिला विशेष आवड आहे. माझी आई घरातील सर्व सदस्यांची योग्य काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते.
जर घरात कोणी आजारी पडले तर आई त्याची दिवस रात्र काळजी घेते. अश्या वेळी ती रात्र रात्र जागून आमची काळजी करते. माझी आई एक दयाळू आणि उदार मनाची महिला आहे. ती वेळोवेळी गरिबांना दानधर्म करते. तिला गरीब व गरजू लोकांना अन्न देण्यात आनंद वाटतो. माझी आई दररोज न चुकता मंदिरात जाते व सण उत्सवाच्या दिवशी उपवास देखील करते. बाबांच्या दिर्घा आयुष्यासाठी ती सर्व काही करत असते.
Mazi Aai Essay In Marathi
आई आमच्या भविष्याच्या मार्गावर जास्त लक्ष देते तिला तिची मुल चांगल्या वृत्तीची घडवायची आहेत. तिची इच्छा आहे की आम्ही एक आदर्श नागरिक समाजामध्ये बनावे व समाजाच्या कामासाठी उपयोगी यावी. दररोज संध्याकाळी आई आम्हाला इतिहासाक गोष्टी कथा, महाराजांचे गडकिल्ले यान विषयी महिती सांगत असते.
माझ्या आईला सकाळ पासून तर रात्री पर्यंत घराची सर्व कामे करावी लागतात व त्याच बरोबर माझी माझ्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्यावी लागते. ती सकाळी 6 वाजता उठते व आमच्या उठण्याच्या आधीच ती आमच्या चहा नाश्त्याची सोय करून ठेवते. नंतर माझ्या शाळेच्या वेळे आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते व मला कधी-कधी वेळेनुसार शाळेतपण सोडयला येते. आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. मंदिरातून परत आल्यावर घरातील इतर कामे आवरते. दिवसभर काही न काही काम सुरूच असतात आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अश्या पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असूनही ती आमच्यासाठी वेळ काढत असते व माझ्यावर खुप प्रेम करते माझी आई या जागातली सर्वात सुंदर आई आहे.
Mazi Aai Essay In Marathi
🔴आईसाठी 10 ओळी छोटा निबंध 👇
1) माझी आई माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी खुप महत्वाची व्यक्ती आहे
2) माझी आईच माझ्यावर व माझ माझ्या आईवर खुप जास्त प्रेम आहे
3) माझी आई मला रोज शाळेत जाण्यासाठी लवकर उठवते व मला डबा देते
4) माझी आई मला समाजात घडणार्या चांगल्या व वाईट गोष्टी समजावून सांगते
5) माझी आई मला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवते व वाईट गोष्टीन पासून लांब ठेवते.
6) माझी आई मला दररोज छान छान बोदकथा सांगते.
7) माझी आई मला जीवापाड काळजी पुर्वक नेहमी जपते
8) माझी आई मला आभ्यासात नेहमी मदत करते
9) माझी आई मला सुट्टीच्या दिवशी पावभाजी खायला नेते 9)
10) मी माझ्या आईचा लाडका मुलागा/मुलगी आहे म्हणुन माझ सर्व माझी आई ऐकते
😊आईवर निबंधीत सुंदर आशी प्रेमळ कविता👇
संपूर्ण दिवस तिचा हा कुटुंब सेवेत निघून जाई
पर कधी न थकवा तिज
तीच माझी गोड आई
पदस्पर्श करताच तिचे मी
हृदयास मिळे ही सुख शांतता
सोबतीस संकटकाळी मदतीसहीच होती माझी प्रेमळ माता
तेजस्वी निर्मळ चेहरा पाहताच तिचा
मनीचे दुःख मी विचारून जाय
घरची लक्ष्मी माझा आसरा
तीच माझी कष्टाळू माय आई
माया ममतेचा सागर वात्सल्याची खाण
जणू जगण्यातील सात्विक भाग
स्वतःच्या मनीच्या विसरुनी यातना
जगण्यास देते मज नवप्रेरणा
आशा या देवरूपी आत्माच्या
मी अखंड सेवेत असावं
आम्हा दोघांचं नातं पाहून
त्या परमेश्वरालाही कोडं पडावं…
Mazi Aai Essay In Marathi
आश्या करतो तुम्हाला वरील सर्व आईवर सुंदर मराठी हृदयस्पर्शी निबंध नक्कीच खुप अवडले असतील जर तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रींनीन सोबत व तुमच्या नातेवाईकांसोबत जरुर Share करा व आपल्या thoughtmarathi.com या Website ला Follow करा, कारण आम्ही तुमच्यासाठी आशीच महत्वाची अर्थपूर्ण महिती नेहमी घेऊन येत असतो ज्याचा तुम्हाला सुद्धा खुप फायदा होतो.
Mazi Aai Essay In Marathi
😍हे ही वाचा👇
1) 2024 मातृदिनाच्या शुभेच्छा संदेश
3) नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे