Shivneri Fort Information In Marathi
Shivneri Fort Information In Marathi: “शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ले संपुर्ण माहिती” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल ठिकाण म्हणजे शिवनेरी. किल्ले शिवनेरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे किल्ले आहे. शिवनेरीचा हा प्राचीन व ऐतेहासिक किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहरामध्ये वसले आहे, पुण्यापासून तब्बल १०५ किलोमीटर अंतरावर आहे.
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. व परयातक खुप संख्येने इथे भतकंती करायला व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला जातात. thoughtmarathi.com आज तुम्हाला ह्याच गडाची संपुर्ण व सविस्तर माहिती आज ह्या लेखात सांगणार आहे, अनेक लोकांपर्यंत आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पोहचवन हे एका मराठी माणसांच काम नाही तर त्याची ती जबाबदारी आहे शिवजन्मभूमीने पावन झालेल्या ह्या ठिकाणाची माहिती काहीशी खालील प्रमाणे आहे
Shivneri Fort Information In Marathi
🔴छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी थोडक्यात महिती👇
दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या गडावर झाला होता.हा किल्ला पर्यातनासाठी महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे.
शिवनेरी या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकान अशक्य व कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा सुद्धा बगयला मिळतात.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आसून नाणेघाट डोंगररांग्यांच्या मध्ये स्थित आहे.
शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे गडाचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. इ.स. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख ही त्या काळी केला होता
Shivneri Fort Information In Marathi
हे ही वाचा👉छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी विचार
🔴जुन्नरचा खरा इतिहास👇
अनेक वर्षान पूर्वी शक राजा नहपानाची याची राजधानी जुन्नर ही होती.सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या जागेवर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर पुर्वी दुर्गांची निर्मिती करण्यात आली होती. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतल्या होत्या.
इ.स. ११७० ते १३०८ च्या काळामध्ये यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले, सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली त्याकाळी होती आणि याच सर्व काळात शिवनेरीला महत्वाचे गडाचे स्वरूप प्राप्त झालेले होते.
Shivneri Fort Information In Marathi
जुन्नर जेव्हा इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला होता. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला होता. इ.स.१४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली होती. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते आसे इतिहासात सांगण्यात येते.
काही काळा-नंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या हाती आला होता. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाईला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन.
🔴किल्ला महाराज्यांच्या आवाख्यात कसा आला👇
किल्ले जुन्नर रणसंग्रामात शहाजी महाराजांचे पुत्र थोरले संभाजी राजे यांनी पराक्रम केला होता.इतिहासात दुर्लक्षित युद्ध शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी त्याना जिंकता आले नाही. त्यामुळे जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी ही निजामशाहीत अशी परिस्थिती ओढली होती.
मोगलांविरूद्ध महादेव कोळ्यांनी बंड केला होता त्या वेळी १६५०यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले होते. यात मोगलांचा विजय झाला. पुढे १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला शिवाजी राजांनी केला होता.
जेव्हा शिवाजी महाराजांच्या उत्तरेकडील मोहिमेच्या वेळी मोरोपंत पेशवे पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही, कारण शिवरायांना त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद इतिहासत सापडते आहे. पण स्वराज्याचा सीमा ह्या साल्हेर पर्यंत होत्या. त्यामुळे जुन्नन शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे. तसेच चावंड, हडसर, जीवधन सारखे किल्ले स्वराज्याच्या अस्थित्वात होते. तसेच छत्रपती शंभाजी महाराजांच्या वेळी औरंगझेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांना जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत सुद्धा इतिहासाच्या पानांवर कैद आहेत आजही
Shivneri Fort Information In Marathi
पुन्हा एकदा १७६५मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केला होता. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. यामध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले होत. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा सुद्धा करण्यात आली होती. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. सरखे होणाऱ्या या बंडामुळे पेशवे खुप हैराण झाले होते. पुढे काळ-१७७१मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू करण्यात त्यान यश मिळाले होते.
त्या वेळी पेशव्यांच्या काळात शिवनेरीचा उपयोग हा बंद कैद्यांसाठी केला जात होता. गड-शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येत होतेआस त्या काळी होत होत. १८ एप्रिल १७७४ रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात यशस्वी पार झाले होते, इतिहासात सुद्धा अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड व दुर्वास्ता खुप झाली होती.
Shivneri Fort Information In Marathi
इतिहासात अशी नोंद आहे की सन १० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला,
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाच्या डोळ्यात खुप खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याची काही जाणीव होत नव्हती. त्याच काळात काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला होता. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर जेव्हा सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते हे लक्षात आले होते. कदाचित ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या महादेव कोळ्यांनी प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा आसे इतिहासात म्हटले जाते.
मोगलांनी यांवर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांचा पराभव करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली तिथेपाठवली होती. शिवनेरीला वेढा पडला तेव्हा महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली होती. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले.
🔴शिवनेरी गडावर जाण्यासाठी प्रमूख वाटा👇
(शिवनेरी गडावर जाण्याच्या मुख्याता प्रमुख दोन वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते)
🔴सात दरवाज्यांची वाट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत गेल्यानंतर डांबरी रस्ता आपल्याला गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, तर सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गेवरून शिवनेरी गडावर पोहचण्यासाठी तब्बल दीड तास हमखास लागतोच लागतो.
🔴गडावरील साखळीची वाट
साखळीच्या वाटेने गडावर यायच असेल तर जुन्नर शहरात आल्यानंतर नव्या बसडेपो समोरील मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ याव लागत. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या मार्गाने साधारणत एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बजुला एक मंदिर लागतो, मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट शिदा शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीकडे घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने जाता येते. ही वाट थोडी अवघड व खडतल असून गडावर पोहचण्यास पाऊण तास येवढा तरी वेळ लागतो.
Shivneri Fort Information In Marathi
आश्या करतो तुम्हाला सर्वांना वरील महिती नक्कीच खुप अवडली असेल, वाचलेली सर्व महिती ही इतिहासावर आधारीत आहे, आम्ही सुद्धा कुठे तरी वाचून त्याला सोप्प्या व सरळ भाषेत या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी काही चुकल्यास माफ करा व तुमच्या सर्व मित्र-मैत्रींनीन सोबत Share करा व आप्लया thoughtmarathi.com या Website ल नक्की Follow करा, कारण आम्ही तुमच्यासाठी आशिच इतिहासावर अधारीत मराठी भूमी पुत्रांची व गडकिल्यांची सर्व महिती घेऊन येत असतो.धन्यवाद
Shivneri Fort Information In Marathi
🔴हे ही वाचा👇
1) रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती
2) 100+ स्वामी समर्थांचे विचार
3) छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण माहिती